या रोपांची लागवड केल्यास सरकार देणार अनुदान !

बातमी शेअर करा

कृषी सेवक । १७ जानेवारी २०२३ । विदेशासह देशात मोठ्या प्रमाणात लाकडांची मागणी वाढली आहे. त्यासाठी देशातील वेगवेगळ्या राज्य सरकारच्यावतीनं वृक्ष लागवडीस प्रोत्साहन दिलं जात आहे. फर्निचर, प्लायवूडपासून ते जहाज तयार करण्यापर्यंत अनेक ठिकाणी लाकडाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. सध्या देशात आणि परदेशात सागवान लाकडाला मोठी मागणी आहे. त्यामुळं छत्तीसगड सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. सागवान वृक्षाची लागवड करण्यासाठी 100 टक्के अनुदान देण्याचा निर्णय छत्तीसगड सरकारनं घेतला आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

कमी खर्चामध्ये काही वर्षांमध्येच तुम्हाला जर लाखो रुपयांचा नफा मिळवायचा असले तर सागवान शेती पडवते. आपण शेतात कोणत्या प्रकारच्या वृक्षाची लागवड करतो, त्यावर नफा मिळणे अवलंबून असते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चंदनाची मागणी खूप आहे, परंतू आजकाल सागवानालाही मोठी मागणी आहे. सागवानाच्या लाकडाचे विविध उपयोग आहेत. हे लाकून उच्च प्रतिचे आणि टिकावू असल्यामुळं सर्वच ठिकाणी त्याचा वापर केला जातो.

अनुदानाचा लाभ कसा मिळवाल? काय आहेत नियम
सागवानाची लागवड वाढवण्यासाठी छत्तीसगड सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. सागवान वृक्षाची लागवड करण्यासाठी 100 टक्के अनुदान देण्याचा निर्णय छत्तीसगड सरकारनं घेतला आहे. सरकारनं मुख्यमंत्री वृक्षसंपदा योजना सुरू केली आहे. त्या अंतर्गत टिश्यू कल्चर साग, टिश्यू कल्चर बांबू, मिलिया डुबिया (मलबार कडुनिंब), चंदन, क्लोनल निलगिरी आणि इतर नगदी पिके लावण्याची योजना आहे. याद्वारे सागवान लागवडीसाठी शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदान दिलं जाणार आहे. शेतकर्यांना सुमारे 5 एकर जमिनीवर सुमारे 5000 रोपे लावण्यासाठी हे 100 टक्के अनुदान दिलं जाईल. मात्र, जर त्यांना 5 एकरपेक्षा जास्त जमिनीवर ही रोपे लावायची असतील तर सरकार 50 टक्के अनुदान देणार असल्याची माहिती देण्यात आली. 3 वर्षामध्ये तीन हप्त्यांत 25 हजार 500 रुपये अनुदान टिश्यू कल्चर तंत्राने सागवानाची लागवड करण्यासाठी 3 वर्षामध्ये तीन हप्त्यांत 25 हजार 500 रुपये अनुदान दिलं जाईल.

पहिल्या हप्त्यात 11 हजार 500 रुपये, दुसऱ्या हप्त्यात 7 हजार रुपये आणि तिसऱ्या हप्त्यात 7हजार रुपये अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सागवानाची रोपे मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यासाठी अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग केली जाईल.

एकदा रोपे लावल्यानंतर लाभार्थींना अनुदानाचा दुसरा आणि तिसरा हप्ता फक्त जिवंत रोपांच्या आधारावर मिळेल. अनुदानाचा लाभ कोण घेऊ शकतो छत्तीसगड सरकारने मुख्यमंत्री वृक्षसंपदा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदान देण्यासाठी काही नियम केले आहेत. ज्यामध्ये त्यांच्या स्वत:च्या शेतीयोग्य जमीन असलेल्या जमीनमालक शेतकऱ्यांना समाविष्ट करण्यात आले आहे. याशिवाय शासकीय, निमशासकीय व शासनाशी संबंधित संस्था, खासगी शैक्षणिक संस्था, खासगी ट्रस्टच्या अशासकीय संस्था, ग्रामपंचायती आणि भाडेतत्त्वावर जमीन घेणारे शेतकरीही सागवान रोपे लावू शकतात.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम