सरकार वाढविणार साखरेची निर्यात !

बातमी शेअर करा

कृषी सेवक । १७ फेब्रुवारी २०२३।  सर्वोच्च टप्प्यावर असलेला देशातील गळीत हंगाम आहे. देशात अनुमानीत साखर उत्पादन झाले तर सरकार निर्यात कोटा वाढविण्याचा निर्णय घेईल, अशी शक्यता आहे. सध्याचा साखर निर्यात कोटा ६० लाख टन आहे. आणि साखर उद्योगाच्या म्हणण्यानुसार हा कोटा वाढविण्याची गरज आहे. या वर्षीही देशात उच्चांकी साखर उत्पादन होण्याचे अनुमान आहे. आणि जागतिक बाजारात अद्यापही साखरेच्या किमती उच्च स्तरावर आहेत. याचा लाभ घेण्यासाठी साखर उद्योग सरकारकडे निर्यात कोटा वाढविण्याची मागणी सातत्याने करीत आहे. गेल्यावर्षी भारताने उच्चांकी ११० लाख टन साखर निर्यात केली होती.

अन्न सचिव संजीव चोपडा यांनी बुधवारी पत्रकारांनी बोलताना सांगितले, आम्ही साखर निर्यातीचे प्रमाण वाढविण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. आम्ही देशात सुरू असलेल्या हंगामातील साखर उत्पादनावर बारीक लक्ष ठेवून आले आहेत. अनुमानीत उत्पादनाची अंतिम आकडेवारी किती असेल याच्या आधारावर आम्ही मार्च महिन्यात निर्णय घेऊ शकते. ते म्हणाले की, काही राज्यांमध्ये खराब हवामानामुळे साखर उत्पादन कमी होईल अशी शक्यता आहे. अलिकडेच इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (ISMA) सांगितले की, साखर उत्पादन चालू वर्षात ५ टक्क्यांनी घसरुन ३४० लाख टन राहील अशी शक्यता आहे. कारण, इथेनॉल उत्पादनासाठी उसाच्या रसाचा वापर अधिक प्रमाणात केला जात आहे. वर्ष २०२१-२२ मध्ये साखरेचे उत्पादन ३५८ लाख टन झाले होते.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम