कृषी सेवक । १७ फेब्रुवारी २०२३। शेतकरीचा जवळचा मित्र म्हणून नेहमीच गाय असते. राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी गाईचे पालन पोषण करीत असतो. तुम्ही नेहमी एकले असेल कि गाय एक दोन वासरांना जन्म देवू शकते पण हि घटना एकूण तुम्ही थक्क व्हाल अशी घटना सोलापूर जिल्ह्यात घडली आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पापरी गावात घडली आहे. विशेष म्हणजे ही चार वाससे आणि गाय अगदी ठणठणीत आहे. एकाच वेळी चार वासरांचा जन्म होणं ही दुर्मिळ गोष्ट मानली जात आहे. दरम्यान, गायीच्या वासरांना बघण्यासाठी लोक गर्दी करत आहेत.
मोहोळ तालुक्यातील पापरी गावात एका गायीने चार वासरांना जन्म दिला आहे. गणेश लोंढे असे गायीच्या मालकाचे नाव आहे. लोंढे यांनी 2017 ला मुंबईतील नोकरी सोडून गावात शेती करण्यास सुरुवात केली. त्यानंतर 2018 मध्ये त्यांनी लक्ष्मी नावाची ही गाय खरेदी केली होती. या गायीची आतापर्यंत चार वेळा प्रसूती झाली आहे. त्यात तिने पहिल्यांदा अशा पद्धतीने एकाच वेळी चार वासरांना जन्म दिल्याची घटना घडली आहे. व्यवस्थित खुराक दिल्यानं गायीचे पोषण व्यवस्थित झाल्यानेच असे झाले असावे. ही गाय खऱ्या अर्थाने लक्ष्मी आहे. अशी प्रतिक्रिया शेतकरी गणेश लोंढे यांनी दिली.
याबाबत माहिती देताना गणेश लोंढे म्हणाले की, गायीने जन्म दिलेल्या चार वासरांपैकी एक खोंड आणि तीन कालवडी आहेत. पहिल्यांदा गाईला खोंड झाले. त्यानंतर थोड्या थोड्या वेळाने गायीनं तीन कालवडींना जन्म दिल्याची माहिती शेतकरी गणेश लोंढे यांनी दिली आहे. गाय आणि ही चारही वासरे व्यवस्थित आहे. आजपर्यंत आपण गाईला एक किंवा दोन वासरे झाल्याचे एकले किंवा बघितले असेल. पण मोहोळ तालुक्याच एकाच वेळी गायीने चार वारसांना जन्म दिल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. चार वासरांना जन्म देणारी गाय ही आपणास लाभदायक आहे. ही गाय खऱ्या अर्थाने लक्ष्मी असल्याचे शेतकरी गणेश लोंढे यांनी सांगितले आहे. या दुर्मिळ घटनेची चर्चा सध्या संपूर्ण मोहोळ तालुक्यात सुरु झाली आहे. या गाईला आणि वासरांना बघण्यासाठी लोक येत आहेत.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम