हरभरा पिकाची काढणी मात्र भाव नाहीच !

बातमी शेअर करा

कृषी सेवक । ६ फेब्रुवारी २०२३।  गेल्या पंधरा दिवसापुर्वी पडलेल्या धुक्यामुळे शेतकऱ्यांच्या पीकाचं मोठं नुकसान झाल आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. विशेष शेतकऱ्यांनी सरकारने मदत करण्याची मागणी केली आहे. चांगलं पीक आलेलं असताना अंतिम टप्प्यात धुक्यामुळं हरभरा पीकाला मोठा फटका बसला आहे.

अंबाजोगाई शिवारातील रब्बीतील प्रमुख पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरभरा पिकाची काढणी सध्या सुरु आहे. शेतकरी काढणीला आलेला हरभरा पीक काढण्यात अधिक गुंतल्याचं दिसत आहे. सुरुवातीला हरभरा पीक जोमात आले होते, मध्यंतरी वातावरणात झालेल्या अचानक बदलामुळे व धुक्यामुळे या पिकाला मोठा फटका बसल्याचं शेतकरी सांगत आहेत. त्यानंतर आता काढणीला आलेले पीक हाताशी आले असताना हरभऱ्याला बाजारात आवश्यक भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना अर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. सरकारने हरभऱ्याला चांगला हमीभाव द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम