मुलाने केला जुगाड : उन्हाळ्यात गोठा केला थंडा !

बातमी शेअर करा

कृषी सेवक । ६ फेब्रुवारी २०२३।  राज्यातील फेब्रुवारी महिन्यापासून उष्णता मोठ्या प्रमाणात वाढायला सुरवात झाला कि पशुपालक चांगलेच संकटात येत असतात, अनेक भागात तापमान ३५ अंशांच्या वर गेले आहे. वाढत्या उष्णतेमुळे केवळ माणसाचं नाही तर जनावरं देखील हैराण झाली आहेत. त्यामुळे पशुपालकांना मोठी समस्या उद्भवत आहे. त्यामुळे दुग्ध उत्पादनावर देखील परिणाम होतो आहे. याच समस्येने हैराण असलेल्या पशुपालकाच्या मुलाने मोबाईलवरील यु ट्यूब चे व्हिडीओ पाहून भन्नाट जुगाड केला आहे आणि त्याचा जुगाड यशस्वी देखील झाला आहे. त्यामुळे जनावरांचा गोठा देखील थंडा थंडा कुल कुल झाला आहे.

तर ही बातमी आहे सोलापुरातील . सोलापुरातल्या मोहोळ येथील १६ वर्षीय मुलाने आपल्या वडिलांना मदत करायची म्हणून वातानुकूलित पंखे अन् फॉगरच्या साहाय्याने पाण्याची फवारणी करीत जनावरांचा गोठा थंडा थंडा कुल कुल केला आहे. शेतीला जोडधंदा म्हणून मोहोळ तालुक्यातील वडवळ येथील शिवाजी साळुंखे हे पशुपालनाचा व्यवसाय त्यांच्या भावाच्या शेतीमध्ये सुरु केला आहे. मुक्त गोठा प्रकल्पात त्यांनी जर्सी जनावरांचे पालन सुरू केले. त्यांचा १६ वर्षीय मुलगा शुभम हा देखील त्यांना या कामात मदत करतो. वाढत्या उन्हामुळे जनावरे आजारी पडू लागली होती. त्यामुळे दूध उत्पादनावर त्याचा परिणाम होत होता.

या समस्येवर तोडगा काढण्यासाठी शुभमने मोबाईलवरील यु ट्यूबच्या माध्यमातून माहिती मिळवली गोठ्यामध्ये शेतात उपलब्ध असलेल्या ड्रीपची पाइप, बॅटरीवर चालणारा पंप घरातच उपलब्ध असणारे पंखे व पाच फॉगर ऑनलाइन मागवले आणि हा प्रयोग यशस्वी केला. बॅटरी पंपामध्ये साधारण वीस लीटर पाणी बसते आणि याच वीस लीटर बॅटरी पंपाच्या साह्याने त्यामध्ये पाणी ओतून त्याने हे फॉगर चालू केले. विजेवरती तीन पंखे सुरू केल्यानंतर हा बॅटरी पंप चालू केला की, त्यातील पाणी या ड्रीपच्या पाइपमधून सर्वत्र जाते आणि तुषार सिंचनाप्रमाणे यामधील पाणी, त्याचे तुषार कण उडू लागतात आणि यामुळे पूर्ण गोठ्यामध्ये थंड वाऱ्याची झुळूक निर्माण होते. जनावरांच्या पाठीवर थंड तुषार पडतो. गोठा अगदी गारेगार होऊन ते जनावरांचे थंडा घरच तयार होते. हा थंडगार गोठा तयार करण्यासाठी फक्त २ हजार रुपये खर्च आला असल्याचे शुभमने सांगितले. साळुंखे यांच्याकडे सध्या पंधरा जर्सी गाई असून या गाईंपासून ११० ते १२० लीटर दूध दररोज संकलन होते. लहान वयातच शेतीपूरक व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळू लागल्याने शुभमचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम