सोयाबीनच्या बाजारभावात सुधारणा

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २८ ऑक्टोबर २०२२ |सध्या बांधावरून खरेदी होणाऱ्या सोयाबीनला सरासरी ४ हजार ३०० ते ४ हजार ७०० रुपये क्विंटल दर मिळत असून मात्र दुसरीकडे सोयाबीनच्या बाजारभावात सुधारणा झालेली दिसत आहे. . काल सोयाबीनचा सरासरी दर हा ४ हजार ९०० ते ५ हजार १०० रुपये होता. तर आज सोयाबीनच्या दरात क्विंटलमागे ५० ते १०० रुपयांची सुधारणा झाली होती. अनेक बाजारांमध्ये ५ हजार ते ५ हजार २०० रुपयांच्या दरम्यान सोयाबीनचे व्यवहार झाले. सोयाबीनचे दर या दरपातळीवर टिकून राहू शकतात. शेतकऱ्यांनी ५ हजार ते ६ हजार रुपयांची दरपातळी लक्षात ठेऊन टप्प्याटप्पयाने विक्री करावी, असे जाणकारांनी सांगितले.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम