कृषी सेवक I ४ डिसेंबर २०२२ I मागील हंगामात देशात हरभऱ्याचे विक्रमी उत्पादनझाले होते. परंतु सरकारने केवळ १७ टक्के मालाची खरेदी केली. त्यामुळे खुल्या बाजारात हमीभावापेक्षा कमी दराने हरभरा विकायची वेळ शेतकऱ्यांवर आली. नंतरच्या काळात नाफेडनेही आपल्याकडील साठा टप्प्याटप्याने बाजारात आणला. त्यामुळे बाजारावर नाफेडच्या विक्रीचा दबाव कायम राहिला. ऐन दिवाळीतही हरभऱ्याचे दर वाढले नव्हते. शेतकऱ्यांना क्विंटलमागे सरासरी ८०० रुपये कमी दर मिळाला. सध्या हरभऱ्याला प्रतिक्विंटल ४ हजार ३०० ते ४ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे.
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार रब्बी हंगामाच्या सुरूवातीच्या टप्प्यात हरभऱ्याचा पेरा गेल्या वर्षीपेक्षा साडेपाच टक्क्यांनी जास्त झालेला दिसतो. गेल्या वर्षी २ डिसेंबरपर्यंत ७६ लाख हेक्टरवर हरभऱ्याचा पेरा होता. मात्र यंदा याच कालावधीत हरभरा पेरा ८० लाख हेक्टरवर पोहोचला आहे. वास्तविक यंदा गहू आणि मोहरीच्या लागवडीत मोठी वाढ होण्याची चिन्हे आहेत.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम