कृषी सेवक | ९ नोव्हेंबर २०२२ | राज्यातील बाजारात सध्या गवारचे दर तेजीतच आहेत. सध्या बाजारात गवारची आवक घटलेली आहे. पुणे, मुंबई आणि नागपूर बाजारातील आवक सरासरी १०० क्विंटलपेक्षा जास्त नाही. तर इतर बाजारातील आवक ही २० क्विंटलपेक्षाही कमी आहे. त्यामुळं गवारचे दर तेजीत आहेत. सध्या गवारला सरासरी ३ हजार ५०० ते ५ हजार रुपये दर मिळतोय. गावरचे दर पुढील काही दिवस टिकून राहतील, असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम