सांगलीत बेदाण्याचे सौदे एक महिना बंद ठेवण्याचा निर्णय

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ९ नोव्हेंबर २०२२ | बेदाण्याचे येणे-देणे पूर्ण करण्यासाठी बेदाण्याचे सौदे एक महिना बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी (ता. १२) व्यापारी, अडते, सांगली बाजार समिती प्रशासन यांची एकत्रिक बैठक होणार आहे. या बैठकीत शून्य पेमेंटबाबत आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतरच सौदे कधी सुरू करायचे याचा निर्णय होणार असल्याची माहिती बेदाणा व्यापारी संघटनेने दिली.सांगली-तासगाव बेदाणा व्यापारी संघटनेतर्फे बेदाणा व्यवहारात पारदर्शकता यावी. पेमेंटची देवाण-घेवाण योग्य वेळेत व्हावी यासाठी शून्य पेमेंट संकल्पना सुरू झाली. फसव्या खरेदीदारांना अटकाव करण्यासाठी दिवाळीला येणी-देणी पूर्ण करण्याचा नियम संघटनेने अंमलात आणला आहे. यामुळे यंदा एकाच बैठकीत सौदे सुरू करण्याचा निर्णय होणार का, याकडे बेदाणा उत्पादकांचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम