हवामान विभागाचा अंदाज ; महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बरसणार !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | १ सप्टेंबर २०२३ | राज्याच्या विविध भागांतून पाऊस चक्क गायबच झाला आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने मोठा खंड दिला असून, अशातच शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मान्सून पुन्हा राज्यात दमदारपणे सक्रीय होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

यंदा राज्यात मान्सूनचे उशिराने आगमन झाले. जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला. मात्र ऑगस्ट महिन्यात पावसाने मोठा खंड दिला. पाऊस गायब झाल्याने फुलोऱ्यात आलेल्या सोयाबीन, कापूस या महत्त्वाच्या पिकांवर कीड-रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला. केवळ पावसा आभावी पिके वाया जातील की काय ? अशी शक्यता निर्माण झाल्याने, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

paid add

यंदाच्या एकूण मान्सून पावसाचा विचार करता राज्यात मान्सूनच्या सुरूवातीपासून ते आतापर्यंत केवळ 7 टक्के पावसाची कमतरता दिसून येत आहे. आतापर्यंत राज्यात सामान्य 741.10 मिमीच्या तुलनेत 692.70 मिमी पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. मात्र यंदा कुठे अतिवृष्टी तर कुठे पावसाचा पत्ताच नाही असे मान्सूनचे रूप पहावयास मिळाले. मुख्यत: यंदा वेळेत आणि सर्वदूर पावसाचे प्रमाण कमी राहिले.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सध्या मान्सून टर्फ (आस) सध्या हिमालयाच्या पायथ्याशी केंद्रीत आहे. 2 सप्टेंबरपासून मान्सून टर्फचे पूर्वेकडील टोक दक्षिणेकडे सरकण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. त्यामुळे ईशान्य भारतात पुन्हा जोरदार मान्सून सक्रीय होईल, असा अंदाज आहे. महाराष्ट्रात पुन्हा मान्सून दमदारपणे सक्रीय होण्यासाठी मात्र सप्टेंबरच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात दमदार पाऊस होण्याची शक्यता आयएमडीने (IMD) वर्तवली आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम