शिंदे सरकारने शब्द पाळला! नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

बातमी शेअर करा

कृषी सेवक । २५ जानेवारी २०२३ । गेल्या काही वर्षांपासून नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकरी मित्रांना सरकारकडून दिलासा देण्याची मागणी केली जात होती. अखेर शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. सरकारने महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली.

आता याच योजनेअंतर्गत नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. या कर्जमुक्ती योजनेसाठी ७०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये पर्यंतच्या प्रोत्साहन पर लाभासाठी राज्य सरकारकडून ७०० कोटींचा निधीची तरतूद करण्यात आली आहे. सरकारने याआधी २९०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आलेली असुन आता ७०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

यामुळे सरकारी तिजोरीवर ४७०० कोटी रुपयांचा अतिरिक्त भर राज्याच्या तिजोरीवर पडणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा निर्णय लांबला होता. कोरोनामुळे निधी रखडला होता. परंतु, आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने निर्णय होऊ लागले आहेत.

शेतकऱ्यांना १८ ऑक्टोबर २०२२ रोजी ६५० कोटी वितरित केल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी २ हजार ९०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता.

 

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम