बाजारात सध्या मक्याचा पुरवठा कमी

बातमी शेअर करा

कृषी सेवक I ७ डिसेंबर २०२२ I देशात यंदा खरिपात २३१ लाख टन मका उत्पादन होईल, असा अंदाज केंद्र सरकारने व्यक्त केला होता. मात्र देशात सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात जोरदार पाऊस झाले. तसेच नोव्हेंबर महिन्यातही बहुतेक भागांमध्ये सतत पाऊस झाला. याचा फटका मका पिकाला  बसला. तसेच मक्यावर काही भागांमध्ये कीड-रोगांचाही प्रादुर्भाव आढळून आला होता. त्यामुळे मका उत्पादन कमी तर झालेच शिवाय मक्याच्या गुणवत्तेवरही परिणाम झाल्याचं शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे खरिपात राज्यातील मका उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा कमी राहल्याचं सांगितलं जातं.

तर कर्नाटकातील उत्पादन गेल्यावर्षीऐवढे होईल, असा अंदाज मका प्रक्रिया उद्योगाने व्यक्त केला आहे. तर रशिया आणि युक्रेनमधून आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या मक्याचा पुरवठा कमी होत असल्याने देशातून निर्यात चांगली सुरु आहे. याचा आधार देशातील मका बाजाराला मिळत आहे. देशातील बाजारात सध्या मक्याला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ते २ हजार २०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. मात्र मक्याची आवक सध्या मर्यादीत आहे. त्यातच रब्बीतील लागवड वाढत असली तरी पीक येण्यास खूप वेळ आहे. त्यामुळे मका दरात पुढील काळात २०० ते ३०० रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम