बाजरीचे दर तेजीत

बातमी शेअर करा

कृषी लक्ष्मी I ७ डिसेंबर २०२२ I मागील हंगामात देशातील बाजरी उत्पादन जवळपास १ लाख टनाने कमी होऊन ९ लाख ६७ हजार टनांवर स्थिरावले होते. यंदाही महत्वाच्या बाजरी उत्पादक राज्यांमध्ये पावसाचा पिकाला तडाखा बसला होता. त्यामुळे उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे.

 

सरकारने यंदा ९ लाख ७५ हजार टन उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र उत्पादन यापेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे. त्यातच सध्या बाजारातील आवकही कमी आहे. त्यामुळे बाजरीच्या दरात सुधारणा झाली. सध्या बाजरीला प्रतिक्विंटल २ हजार ५०० ते ३ हजार १०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. बाजारीच्या दरातील तेजी टिकून राहील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम