केळीच्या बागांवर सीएमव्ही विषाणूचा धोका

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १७ ऑक्टोबर २०२२ | केळीच्या बागांवर सीएमव्ही विषाणूचा  धोका वाढत असून देशातील सर्वाधिक केली उत्पादक जळगाव जिल्ह्यात सध्या केळी उत्पादक अडचणीत सापडले आहेत. या रोगामुळे फळबागांवर  वाढ होत असल्याने शेकडो हेक्टर क्षेत्रातील केळी पीक नष्ट होण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांनी फळबागांतील खराब झाडे फेकून देण्यास सुरुवात केली आहे. केळीवर सीएमव्ही विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी गेल्या दोन महिन्यांपासून हैराण झाला आहे. केळीच्या उत्पादनातही मोठी घट झाली आहे.

जळगाव जिल्ह्यात केळीचे सर्वाधिक उत्पादन होते. येथील केळी परदेशात निर्यात केली जातात. जळगावच्या केळीला २०१६ मध्ये भौगोलिक संकेत (GI) मिळाले. जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी केळीच्या लागवडीवर अवलंबून आहेत.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम