दगावलेल्या जनावरांच्या मालकाला आर्थिक मदत

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १७ ऑक्टोबर २०२२ | लम्पी आजारामुळे दगावलेल्या जनावरांच्या मालकाला आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. यामध्ये दुधाळ गायीचा मृत्यू झालेला असल्यास मालकाला ३० हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे. लम्पी आजारामुळे बैलाचा मृत्यू झाल्यास २५ हजार रुपयांचे आर्थिक साहाय्य करण्यात येणार आहे. तर वासराचा मृत्यू झाल्या १६ हजार रुपयांची मदत संबंधित मालकाला मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
राज्य सरकारकडून कडून मदतीचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. . ४ ऑगस्टपासून ज्यांची जनावरं लम्पी आजारामुळे मृत्युमुखी पडली आहेत, त्यांना सरकारकडून आर्थिक मदत करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता नवीन सुरुवात करण्यास मदत होणार आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणातील निकषांप्रमाणे ही मदत जाहीर करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम