शेतकऱ्यांच्या आंदोलनाने वाहतूक व्यवस्था काेलमडली

बातमी शेअर करा

कृषीसेवक | ९ नोव्हेबर २०२३

राज्यातील महायुती सरकारने दिवाळीपूर्वीच ४० तालुके दुष्काळ जाहीर केल्याने आता अनेक जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक होवून आंदोलनाला सुरुवात केली आहे. आज गुरुवारी सांगली जिल्ह्यातील जत तालुका दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी विविध ठिकाणी ग्रामस्थांनी रास्ता राेकाे आंदाेलन केले. या आंदाेलनामुळे ठिकठिकाणची वाहतूक व्यवस्था काेलमडली.

जत तालुका पाणी संघर्ष समितीच्या वतीने उमदी, तिकोंडी व मुचंडी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. नगर ते विजयपूर, जत ते विजयपूर व गुहागर ते विजयपूर मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जत तालुक्यातील पूर्व भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सांगली जिह्यातील अनेक तालुक्याचा दुष्काळी यादीत समावेश झाला पण जत तालुका जो नेहमी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो त्याचा दुष्काळी यादीत समावेश न झाल्याने जत मधील नागरिक आक्रमक झाले आहेत.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम