खान्देशात होणार सीसीआयचे ११ खरेदी केंद्र सुरु !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | ९ नोव्हेबर २०२३

गेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांचा कापूस घरात पडून असल्याने शेतकरी चांगलेच वैतागले आहे पण सध्या खानदेशात कापूस खरेदीची तयारी कापूस महामंडळाने (सीसीआय) केली असून, त्यासंबंधी नोंदणी सुरू झाली आहे. खानदेशात सुमारे ११ खरेदी केंद्र सीसीआय सुरू करणार आहे.

paid add

जळगाव जिल्ह्यात पाचोरा, चाळीसगाव, जामनेर तालुक्यातील पहूर, शेंदूर्णी, जामनेर, भुसावळ, बोदवड, जळगाव, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील नंदुरबार व शहादा येथे सीसीआय कापूस खरेदी करील.खरेदीसंबंधी ७०२० रुपये प्रतिक्विंटलचा हमीभाव दिला जाईल. खरेदी केंद्रात कापूस विक्रीसंबंधी शेतकऱ्यांना प्रथम खरेदी केंद्रात नोंदणी करून घ्यायची आहे. त्यासाठी आधार कार्ड, कापूस पीकपेऱ्याची नोंद असलेला सातबारा उतारा, बँक पासबुकची झेरॉक्स आदी कागदपत्र आवश्यक असणार आहेत.
नोंदणी झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्याला कापूस विक्रीसाठी खरेदी केंद्रात मोबाइलद्वारे सूचना दिली जाईल. सीसीआयच्या खरेदी केंद्रात कापूस विक्रीसंबंधी शेतकऱ्यांना आधार, बँक खाते व मोबाइल लिंक करणे आवश्यक आहे. आधार व मोबाइल, बँक खाते लिंक असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कापूस विक्रीनंतर फक्त तीन दिवसांत परतावा किंवा मोबदला पाठविला जाईल.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम