यंदा गव्हाचे उत्पन्न विक्रमी होण्याची शक्यता

बातमी शेअर करा

कृषी सेवक I १ डिसेंबर २०२२ I भारतात २०२३ मध्ये गव्हाचं विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज आहे. गव्हाला मिळालेला चढा दर आणि पावसामुळे जमिनीतील ओलावा वाढल्यामुळे शेतकऱ्यांना यंदा गव्हाचा पेरा वाढवला आहे.

 

परंतु पिकाच्या वाढीच्या पुढच्या टप्प्यात उष्णतेच्या लाटेची टांगती तलवार आहे. पण सध्या तरी गेल्या हंगामाच्या तुलनेत गव्हाचा पेरा वाढल्याने उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज बांधला जातोय. गहू उत्पादनात वाढ झाल्यास केंद्र सरकार गहू निर्यातीवरील बंदी उठवण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने गव्हाच्या भडकलेल्या किंमतींमुळे मे महिन्यात गहू निर्यातबंदीचा निर्णय घेतला होता.

 

पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश हे देशातील प्रमुख गहू उत्पादक राज्ये आहेत. तिथे गहू लागवडीत फारशी वाढ झालेली नाही. थोड्याफार फरकाने गेल्या वर्षीइतकाच पेरा आहे. परंतु पश्चिम भारतातील राज्यांनी कडधान्य आणि तेलबिया पिकांऐवजी यंदा गव्हाला पसंती दिली आहे. विशेषतः गुजरात आणि राजस्थान या राज्यांनी गहू लागवडीत मोठी उडी मारली आहे. यंदा गहू निर्यातीवर बंदी असूनही शेतकऱ्यांना चढा दर मिळाला.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम