देशांतर्गत बाजारात कापसाचे दर स्थिर

बातमी शेअर करा

कृषी सेवक I १ डिसेंबर २०२२ I देशातील प्रमुख बाजारपेठांमध्ये कापसाचे दर टिकून आहेत. शेतकऱ्यांना दरवाढीची अपेक्षा आहे. कापसाला गेल्या वर्षीइतका विक्रमी दर मिळेल, असं त्यांना वाटतंय. त्यामुळे ते कापूस विक्रीसाठी घाई करत नाहीयैत. किमान १० हजार रूपये क्विंटल भाव मिळाल्याशिवाय कापूस विकायचा नाही, असा पवित्रा अनेक शेतकऱ्यांनी घेतलाय. त्यामुळे बाजारात कापसाची आवक घटलेली आहे. विशेषतः गुजरातमध्ये शेतकरी आक्रमक झालेत. त्यांनी कापूस विक्री रोखून धरलीय. यंदा शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने माल बाजारात आणल्याने कापसाचे दर टिकून आहेत. परंतु आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर दबावाखाली आले आहेत, भारताची कापूस निर्यात सध्या जवळपास थंडावली आहे, टेक्सटाईल उद्योगाकडून अजून मागणीत सुधारणा झालेली नाही. या सर्व घटकांमुळे कापसाच्या दरात गेल्या वर्षीइतकी तेजी येणार नाही, असा तज्ज्ञांचा होरा आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम