बाजारात भेंडीला असते मोठी मागणी !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | २ नोव्हेबर २०२३

देशभरातील प्रत्येक व्यक्ती आपल्या नियमितच्या आहारात अनेक भाज्यांना प्राधान्य देत असतो. कारण भाज्यापासून आपल्या शारिराला आत्यावश्यक अशी पोषक द्रव्ये मिळतात. तसेच अनेक पोषकतत्व असलेल भेंडी हे पिक खरिप व रब्बी दोन्ही हंगामात घेता येत असल्यामुळे भारतातील बहुतेक राज्यातुन भेंडीची लागवड केली जाते. वर्षभर बाजारामध्ये कायम चांगली मागणी असल्यामुळे बाजारभाव देखील चांगला मिळतो व त्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळवता येतो.
भेंडीच्या फळात अ ब आणि क जीवनसत्वे तसेच मॅग्नेशिअम फास्फरस, कॅल्शियम, पोटॅशियम कर्बोदके व लोह इत्यादी घटक भरपूर प्रमाणात असतात. भेंडी पिकामध्ये सर्वाधिक प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात. भेंडी मध्ये असणाऱ्या लोहामुळे रक्तातील हिमोलोबीन वाढीस लागतो.

जमिन – मध्यम भारी ते काळे कसदार जमीन आणि पाण्याचा चांगला निचरा होईल अशा जमिनीची निवड फायद्याचे ठरते.

हवामान – हे पीक उष्ण व दमट हवामानातील आहे. २० ते ४० अंश सेंटीग्रेड तापमानात भेंडीची वाढ चांगली होते तसेच झाडाची वाढ योग्य होवून फुलगळ होत नाही. यापेक्षा कमी तापमान असेल तर त्याचा थेट परिणाम हा उगवणीवर होत असतो.

पूर्व मशागत – लागवडी आधी जमिनीची मशागत करताना एक नांगरणी व दोन कुळवाच्या पाळ्या देणे गरजेचे आहे. नांगरणी करून जमीन भुसभुशीत केल्यानंतर हेक्टर मध्ये 50 गाड्या शेणखत मिसळावे .

कालावधी – खरीप हंगामात लागवडीसाठी जून व जुलै महिना, रब्बी हंगामासाठी जानेवारी व फेब्रुवारी हा कालावधी योग्य ठरतो.

सूधारित जाती –

महिको 10 – ही सर्वात जास्त महाराष्ट्रातले लोकप्रिय जात असून या जातीची फळे गडद हिरव्या रंगाचे असतात व हेक्‍टरी 10 ते 12 टन उत्पादन मिळते.
परभणी क्रांती – मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी या ठिकाणी ही जात विकसित करण्यात आली आहे. या जातीची भेंडी कोवळी, हिरवी किंवा लांब असते. या जातीची लागवडीनंतर 50 ते 55 दिवसात उत्पादन मिळते.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम