राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी : सरकारने घेतला मोठा निर्णय !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | १ नोव्हेबर २०२३

राज्यातील शिंदे व फडणवीस सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयाचा फायदा राज्यातील अनेक शेतकऱ्यांना होणार आहे. ऑक्टोबर महिन्यातच पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात तर ही परिस्थिती आणखी भीषण होऊ शकते. यंदा राज्यात सरासरीपेक्षा खूप कमी प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे महाराष्ट्रावर दुष्काळजन्य परिस्थिती ओढवली आहे. सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. याच पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली.

या बैठकीत महाराष्ट्रातील 40 तालुक्यांनी दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून दुष्काळग्रस्त तालुक्यांना केंद्र सरकारने मदत जाहीर करावी अशी विनंती केली जाणार आहे. दरम्यान, “आवश्यक ते निकष निश्चित करून दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करुन या मंडळाकरीता योग्य त्या सवलती देण्यासाठी मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीकडून निर्णय घेण्यात यावा”, असा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

याप्रमाणे दुसऱ्या टप्प्यातील दुष्काळी तालुक्यांना मदत मिळेल. दुष्काळग्रस्त तालुक्यांत काही सवलती लागू केल्या आहेत. त्यानुसार कृषी पंपांच्या चालू वीजबिलात ३३.५ टक्के सवलत, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, जमीन महसूलात सूट, पिक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचं परिक्षा शुल्क माफ करणे, आवश्यक तिथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकर्सचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे अशा सवलती या तालुक्यांना मिळतील.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम