जगभरात आहे या बटाट्यांची मोठी मागणी !

बातमी शेअर करा

कृषी सेवक । २६ जानेवारी २०२३ ।  देशात शेतकरी मोठ्या प्रमाणात अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ झाली आहे. सोबतच फळे, भाजीपाला याच्या उत्पादनातही वाढ झाली आहे. भारत जगातील अनेक देशांना अन्नधान्यासह फळे भाजीपाला याची निर्यात करतो. सर्वच प्रकारच्या उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी आहे. भारतातील देशी बटाट्यांना परदेशात विशेष मागणी आहे. देशी बटाट्यांमुळं परदेशी लोकांमध्ये देशाची एक खास ओळख निर्माण झाली आहे.

भारताच्या एकूण बटाटा उत्पादनात सहा राज्यांचा 90 टक्के वाटा आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी असली तरी देशी बटाट्याने परदेशी लोकांमध्ये एक खास ओळख निर्माण केली आहे. आज भारतीय देशी बटाटे श्रीलंका, ओमान, इंडोनेशिया, मलेशिया, मॉरिशस अशा अनेक देशांमध्ये निर्यात केली जातात. देशी बटाट्याच्या निर्यातीत 4.6 पट वाढ नोंदवली गेली आहे. भारताच्या एकूण बटाटा उत्पादनात सहा राज्यांचा 90 टक्के वाटा आहे. या बटाट्यांनी मोठी मागणी आहे.

भारतातील माती आणि हवामानात विविधता आढळते. रब्बी हंगामात देशातील विविध राज्यात बटाट्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. देशी बटाट्याला देश-विदेशात मोठी मागणी आहे. आज अनेक राज्यातील शेतकरी बटाट्याच्या लागवडीतून नफा कमवत आहेत. पण उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, गुजरात, मध्य प्रदेश आणि पंजाबच्या शेतकऱ्यांनी बटाटा उत्पादनात सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. या सहा राज्यात 90 टक्के उत्पादन होते. बटाटा उत्पादनात उत्तर प्रदेश अव्वल स्थानावर आहे. या राज्यात 29.65 टक्के शेतकरी बटाट्याचे उत्पादन घेतात. पश्चिम बंगालमध्ये 23.51 टक्के, बिहारमध्ये 17.2 टक्के, गुजरातमध्ये 7.05 टक्के आणि मध्य प्रदेशात 6.68 टक्के आणि पंजाबमध्ये 5.32 टक्के शेतकरी बटाट्याचे उत्पादन होत आहे.

इतर राज्यांच्या तुलनेत उत्तर प्रदेशची बटाटा उत्पादन क्षमता खूप चांगली आहे. त्याचबरोबर ऊसासह, गहू, फळबाग या पिकांचे राज्यात चांगले उत्पादन घेतले जाते. या यादीत पश्चिम बंगाल दुसऱ्या क्रमांकावर आहे. जिथे माती आणि हवामान उत्पादनासाठी सर्वात अनुकूल मानले जाते. या यादीत बिहारचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. गुजरात, मध्य प्रदेश आणि पंजाबमधील शेतकरी बटाट्याचे उत्पादनही मुबलक प्रमाणात घेत आहेत. एकेकाळी बटाट्याची लागवड पारंपारिक पद्धतीने केली जात होती. त्यामुळं पिकांचं नुकसान होत होते. परंतू, आज प्रगत तंत्र आणि योग्य व्यवस्थापनाच्या सहाय्याने बटाट्याचे बंपर उत्पादन घेतले जात आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम