शेतकरी सावधान : दोन दिवसात करा हि गोष्ट अन्यथा मिळणार नाही हप्ता !

बातमी शेअर करा

कृषी सेवक । २६ जानेवारी २०२३ ।  देशातील सर्वच शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 13व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मोदी सरकार लवकरच करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात हा हप्ता जमा करू शकते असे समजत आहे. सुमारे 2 कोटी लोकांना पीएम किसानचा 12 वा हप्ता मिळालेला नव्हता. लाभार्थी शेतकऱ्यांच्या नोंदी केंद्रीय डेटाबेसमध्ये अद्ययावत न केल्यामुळे या शेतकऱ्यांना पूर्वीचा हप्ता मिळू शकला नाही.

आता पीएम किसान योजनेच्या १३ व्या हप्त्याबाबत मोठा अपडेट समोर आला आहे. 2,000 रुपये मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी दोन दिवसांत एक महत्वाचे काम करणे गरजेचे आहे. त्यानंतर फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवले जाणार आहेत. शेतकरी मित्रांनो केंद्र सरकार काही दिवसांतच पीएम किसान योजनेचा १३ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे. मात्र सरकार दरवेळी काही नवीन अपडेट देऊन शेतकऱ्यांची नावे कमी करत असते.
पीएम किसान योजनेअंतर्गत, सर्व जमीनधारक शेतकऱ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये देय असलेले वार्षिक 6,000 रुपये आर्थिक लाभ दिले जातात. यंदाचा 13 वा हप्ता फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देण्यात येणार आहे. मात्र हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी 28 जानेवारीच्या आगोदरच इकेवायसी पूर्ण करणे अनिवार्य आहे. अन्यथा ज्या शेतकऱ्यांची इकेवायसी नाही अशांना १३ वा हप्ता मिळणार नाही.

ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई केवायसी केलेले नाही, ते शेतकरी पीएम किसानसाठी दोन प्रकारे ई केवायसी पूर्ण करू शकतात. हे काम पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटद्वारे घरी बसून ऑनलाइन केले जाऊ शकते. याशिवाय जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला (CSC) भेट देऊनही शेतकरी त्यांचे ई-केवायसी करू शकतात. जर शेतकऱ्याने स्वत: OTP द्वारे ई-केवायसी केले तर तुम्हाला कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम