कापूस उत्पादकांना येणाऱ्या काही महिन्यात मिळेल दिलासा

बातमी शेअर करा

कृषी सेवक I ११ डिसेंबर २०२२ I या हंगामामध्ये कापसाचा अधिक उत्पादन खर्च शेतकरी बंधूंना करावा लागत असून शेतकऱ्यांना कापूस वेचणीचा देखील खर्च जास्त करावा लागत आहे. सध्या मजुरी ही प्रति किलो बारा ते पंधरा प्रतीकिलोच्या दरम्यान झाली असून म्हणजेच क्विंटलला 1200 ते 1500 इतका खर्च शेतकरी बंधूंना करावा लागत आहे.

त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना कापसाचे भाव वाढतील अशी अपेक्षा असून सध्याचे बाजारभावाचा विचार केला तर तो 8200 ते 8 हजार 700 रुपये प्रति क्विंटलपर्यंत मिळत आहे. परंतु जर कापूस उत्पादनासाठी लागणाऱ्या खर्चाचा विचार केला तर त्या दृष्टिकोनातून हा बाजारभाव शेतकऱ्यांना परवडत नाही असे एकंदरीत चित्र आहे व याचाच परिणाम कापूस आवक कमी होण्यावर दिसून येत आहे. परंतु सध्याची परिस्थिती पाहिली तर कापूस दरावर आवकेचा परिणाम दिसून येत नाहीये.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम