रब्बी हंगामातील पिकांच्या राज्यांतर्गत पीक स्पर्धात सहभागी व्हावे

बातमी शेअर करा

कृषी सेवक I ८ डिसेंबर २०२२ I राज्यातील पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडुन विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेचा वाढ करण्यात येते अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकते बाबत प्रोत्साहन देवून गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल यामुळे कृषि उत्पादकते मध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होवून राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल हा उद्देश ठेवून राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.

पिक स्पर्धेतील समाविष्ठ पिके – यास्पर्धेमध्ये रब्बी हंगाम – ज्वारी, गहु, हरभरा, करडई, जवस, तीळ पिक स्पर्धात अर्ज दाखल करण्याची दिनांक 31 डिसेंबर, 2022-12-07 पिक स्पर्धतील पिकाची निवड करताना पिकनिहाय तालुक्यातील संबधित पिकाखालील क्षेत्र किमान 1000 हेक्टर असावे. किमान स्पर्धक संख्या सर्वसाधारण गटासाठी 10 व आदिवासी गटासाठी 5 असावी पीकस्पर्धा मध्ये सहभागी लाभार्थीचे शेतावर त्या पिकाखालील किमान 10 आर क्षेत्राव सलग लागवड अधे आवश्यक आहे.

स्पर्धसाठी प्रवेश शुल्क –

सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी पिकनिहाय प्रत्येक रक्कम रु. 300/- बक्षिस स्वरुप

paid add

1) तालुका पातळीवर पहिले बक्षिस – 5,000/- रुपये, दुसरे बक्षिस – 3,000/- रुपये तिसरे बक्षिस – 2,000/- रुपये.

2) जिल्हा पातळी – पहिले बक्षिस – 10,000/- रुपये, दुसरे बक्षिस -7,000/- रुपये, तिसरे बक्षिस -5,000/- रुपये

तरी जिल्हयातील जास्तीत जास्त शेतक-यांनी पिक स्पर्धेत सहभागी व्हावे, अधिक माहितीसाठी तालुका कृषिी अधिकारी व कृषि अधिकारी पंचायत समिती यांच्याशी संपर्क करण्यात यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम