परवाने अद्यावत करण्यासाठी कृषि निविष्ठा विक्रेत्यांना आवाहन

बातमी शेअर करा

कृषी सेवक I ८ डिसेंबर २०२२ Iजिल्हयातील सर्व कृषि सेवा केंद्राना आवाहन करण्यात येते की, आपले कृषि निविष्ठा परवाने अद्यावत करण्यासाठी प्रथम आपले सरकार https://aaplesarkar.mahaonlie.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करण्यात यावी . नंतर विभाग कृषि विभाग घेऊन उपविभाग-कृषि परवाने सेवा हा पर्याय निवडून आपले बियाणे, खते व किटकनाशक विक्री परवाने अद्यावत करण्यासाठी तात्काळ आवेदन करावे.

ज्या कृषि सेवा केंद्राचे जुने परवाने सद्यस्थितीत वैध असतील त्या सर्वांनी या प्रणालीवर पुन:श्च नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन आवेदन करुन दिनांक 31 डिसेंबर, 2022 पर्यंत या कार्यालयामार्फत परवाने अद्यावत करुन घ्यावे, त्यानंतर जुने परवाने हे ग्राहय धरले जाणार नाही. याची सर्व कृषि निविष्ठा विक्रेत्यांनी नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम