कृषीसेवक | १८ ऑक्टोबर २०२३
गेल्या काही महिन्यापूर्वी टोमॅटो उत्पादक अनेक शेतकऱ्यांनी मोठे उत्पन्न कमविले होते पण त्यानंतर टोमॅटोचा उत्पादन खर्च न निघाल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकला. त्यानंतर पुरवठा घटल्याने २०० रुपये किलोपर्यंत दर गेले. आता पुन्हा मागणीच्या तुलनेत पुरवठा वाढल्याने टोमॅटो उत्पादकांचा खर्च वसूल होत नसल्याने मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. प्रतिकिलोला २ ते ५ रुपये दर मिळत आहे. परिणामी, टोमॅटो तोडणेदेखील परवडत नाही. त्यामुळे शिवारातच टोमॅटोंचा लाल चिखल झाला आहे.
उन्हाळ्यात लागवडीसाठी पाणी कमी असल्याने तुलनेत टोमॅटो लागवडी कमी होत्या. उत्पादकता नसल्याने दरवाढीचा शेतकऱ्यांना ठरावीक फायदा झाला. तेजी असल्याने शेतकऱ्यांनी खरीप लागवडी वाढविल्या.
दरवर्षीच्या नैसर्गिक आपत्तीचा फटका लागवडीला बसला नाही. वातावरण अनुकूल राहिल्याने यंदा उत्पादन चांगले येत आहे. परिणामी, बाजारात आवक वाढल्याने विक्रमी आवक होत आहे. मात्र मिळणारे दर हे अडचणीचे ठरत आहेत. त्यामुळे शेतकरी लागवडी काढून टाकत आहेत. काही शेतकऱ्यांनी उभ्या लागवडीत जनावरे सोडली आहेत.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम