खान्देशातील शेतकऱ्यांनी घेतला पावसाचा धसका !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | १८ ऑक्टोबर २०२३

राज्यातून गेल्या काही दिवसापासून गायब झालेल्या पावसाने खानदेशात सोमवारी सकाळी अनेक भागात हलका पाऊस झाला. शेतकऱ्यांनी पावसाळी वातावरणाचा धसका घेतला असून, कापूस वेचणी, केळीची काढणी वेगात सुरू आहे.

paid add

तीन-चार दिवसांपासून खानदेशात ढगाळ वातावरण आहे. उकाडा, उष्णता जाणवत आहे. मध्यंतरी काही दिवस सकाळी कोरडे किंवा निरभ्र वातावरण व दुपारी ढगाळ, उष्णता अशी स्थिती होती. परंतु मागील दोन दिवसांपासून पावसाळी वातावरण आहे.

दिवसभर ढगाळ वातावरण राहत असल्याने शेतकऱ्यांनी धसका घेतला आहे. यातच सोमवारी धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा, जळगावमधील अमळनेर, पारोळा भागात हलका ते तुरळक पाऊस झाला. तसेच मंगळवारीदेखील जळगाव, धरणगाव, भुसावळ, अमळनेर, चोपडा, धुळ्यातील शिरपूर आदी भागांत तुरळक सरी सकाळी कोसळल्या. कुठेही जोरदार पाऊस झालेला नाही.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम