राज्यातील हळदीचे उत्पादन घटले ; १३ लाखावर पोहचले पोते !

बातमी शेअर करा

कृषी सेवक । १७ जानेवारी २०२३ ।  देशभरात भारतातील सांगली येथून जाणारी हळदी उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. याच हळद व्यापाराला चांगले दिवस यावेत यासाठी स्व. वसंतदादांनी सांगलीत मार्केट यार्डाची आणि हळद वायदेबाजाराची स्थापना केली होती. मात्र अलीकडच्या काही वर्षांत हळदीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटले आहे. हळदीचे 18 ते 20 लाख पोत्यांचे असणारे उत्पादन 13 लाख पोत्यांपर्यंत घटले असल्याचं म्हणत महाराष्ट्र काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी सरकरने यावर क्रियाशील धोरण बनवण्याची मागणी केली आहे.

सुरुवातीला दीड ते पावणेदोन कोटींची उलाढाल करणारा सांगलीचा हळदव्यापार 600 कोटींच्याही पुढे जाऊन पोहोचला आहे. पण गेल्या काही वर्षात हळदीचे उत्पादन सातत्याने घटत आहे ही चिंतेची बाब आहे. अगदी 5 ते 7 वर्षांपूर्वी 18 ते 20 लाख पोत्यांचे असणारे उत्पादन 13 लाख पोत्यांपर्यंत घटले आहे. सांगलीला येलो सिटी घोषित करण्याची संकल्पना चांगली आहे. पण त्यासाठी हळदीचे उत्पादन वाढविण्याबरोबरच उत्पादनखर्च कमी करण्याकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. अन्यथा हळदीचे शहर ही ओळख पुसत चालली असताना नुसतं भिंती रंगवून काहीही होणार नाही असं मत पाटील यांनी व्यक्त केले आहे. ५ ते ७ वर्षांपूर्वी १८ ते २० लाख पोत्यांचे असणारे सांगलीच्या हळदीचे उत्पादन १३ लाख पोत्यांपर्यंत घटले आहे. सांगलीला येलो सिटी घोषित करण्याची संकल्पना चांगली आहे. पण हळदीचे शहर ही ओळख पुसत चालली असताना नुसतं भिंती रंगवून काही होणार नाही. त्यासाठी ठोस कृती कार्यक्रम ही हवा.

दरम्यान, सांगली जिल्ह्यासोबतच कोल्हापूर, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांमध्येही हळदीची लागवड वाढत आहे. हळद हे नागडी पीक शेतकऱ्याला चांगला नफा कमावून देत असल्यानं शेतकरी याकडे वळताना दिसत आहेत. मात्र शेतकऱ्यांना हळद लागवडीचे तंत्रज्ञान समजून घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे बऱ्याचदा शेतकऱ्यांना हळद लागवडीतून मोठ्या नुकसानीलाही सामोरे जावे लागल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे सरकारने हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी कृतिशील कार्यक्रम आखून त्याची योग्य अंमलबजावणी केली तर याचा हळद उत्पादनावर अतिशय चांगला परिणाम दिसून येईल.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम