या शेतीतून कमवू शकता ४० वर्ष पैसे !

बातमी शेअर करा

कृषी सेवक । १६ जानेवारी २०२३ । राज्यातील शेतकरी सतत शेतात मेहनती करीत असतो पण नियोजन नसल्यामुळे कुठेतरी शेतकरीच्या हातात हवा तसा पैसा लागत नाही व याचा व्यापारी चांगलाच फायदा घेत असतो. पण जर कमी पैशात जास्त नफा देणारे पीक घेऊन झटपट श्रीमंत व्हायचे असेल तर बांबू शेती हा उत्तम पर्याय ठरू शकतो. यामुळे अनेक शेतकरी याकडे वळले आहेत.

बांबूचे झाड किमान 40 वर्षं जगू शकते. त्यामुळे एकदा लावलेल्या बांबूपासून चाळीस वर्षे उत्पन्न घेता येऊ शकते. यामुळे हे फायदेशीर आहे.
सध्या बाजारात बांबू हा असा घटक आहे कि त्याचा वापर अनेक उद्योगधंद्यांत केला जातो. तसेच याचे उत्पन्न कमी आणि मागणी वाढली आहे. यामुळे यासाठी सरकार देखील प्रयत्नशील आहे. फर्निचर निर्मितीपासून ते अनेक कामांसाठी बांबू वापरला जातो. भारत दर वर्षी 60 दशलक्ष कोटी रुपये किमतीच्या बांबूची आयात करतो.
बांबू व्यवसायासाठी जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही. सुरुवातीला त्याची किंमत फक्त 2 लाख रुपये आहे. शेतीबरोबर जोडव्यवसायही करून आपण चांगले पैसे कमवू शकतो. मानवी जीवनात खाद्यान्न म्हणून ज्याचा उपयोग प्रामुख्याने केला जातो ती सर्व पिके तृणवर्गीय आहेत. ज्वारी, मका, बाजरी, गहू ही मुख्य पिके एक प्रकारे गवताचाच प्रकार आहे. याचबरोबर ऊसही गवतच म्हणून ओळखले जाते. याच पद्धतीने बांबू सुद्धा एक गवताचाच प्रकार आहे. पूर्वी या बांबूचा वापर प्रामुख्याने घरासाठी केला जात आहे. झोपडी बांधण्यापासून ते आधुनिक काळातील बांबू हाउसपर्यंत याचा वापर केला जात आहे. याशिवाय घरामध्ये वापरण्यात येत असलेल्या बैठक व्यवस्थेसाठीही बांबूचा वापर केला जात आहे. तसेच बांबूच्या कोवळय़ा कोंबाचा वापर भाजीसाठी आणि लोणच्यासाठीही करण्यात येतो.

सुक्ष्म जिवाणू व जमीन पोत…
बांधकाम क्षेत्रात बांबूचा वापर अमर्याद पद्धतीने केला जातो. तसेच इंधन निर्मितीबरोबरच कागद उद्योगामध्येही बांबूचा वापर होत असल्याने बाजारातील बांबूची मागणी वाढतच आहे. आजच्या घडीला बांबू उद्योगातील देशातंर्गत उलाढाल २५ हजार कोटींची आहे. तसेच यासाठी ज्या शेतकऱ्यांना बांबूची शेती करायची आहे त्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यासाठी केंद्र सरकारने बांबू मिशन सुरू केले आहे. शेतकऱ्यांनो म्हशींच्या या जाती आहेत दुधासाठी फायदेशीर, जाणून घ्या.. या अंतर्गत शेतकऱ्यांना बांबू शेती करण्यासाठी प्रतिझाड 120 रुपये शासकीय अनुदान दिले जाते. देशात सातत्याने बांबूला मागणी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर तुम्ही बांबू शेती सुरू केली तर मोठा आर्थिक फायदा मिळू शकतो. दर वर्षी पुनर्लागवड करण्याची गरज नसते. कारण बांबूचे झाड किमान 40 वर्षं जगू शकते. त्यामुळे एकदा लावलेल्या बांबूपासून चाळीस वर्षे उत्पन्न घेता येऊ शकते.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम