हळद उत्पादन यंदा वाढण्याचा अंदाज

बातमी शेअर करा

कृषी सेवक I २४ डिसेंबर २०२२ I यंदा हळद पिकासाठी पोषक वातावरण असल्याने उत्पादन वाढीची शक्यता व्यक्त केली जात आहे. हळदीची लागवडही यंदा मागील वर्षीपेक्षा जवळपास ६ टक्क्यांनी वाढली आहे.

तसेच पोषक वातावरण असल्याने उत्पादकता अधिक येण्याची शक्यता आहे.यंदा पिकासाठी पोषक वातावरण असल्याने हळद उत्पादन वाढीची शक्यता व्यक्त केली जातेय. यंदा देशात ३ लाख ५६ हजार हेक्टरवर हळद पीक आहे. मागील वर्षीपेक्षा हे क्षेत्र जवळपास ६ टक्क्यांनी अधिक असल्याचं जाणकारांनी सांगितलं. चालू हंगामात हळद लागवडीपासून पाऊस आणि पोषक वातावरण होते.

 

यामुळे हळदीवर रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला नाही. मागीलवर्षी देशातून १ लाख ५३ हजार १५४ टन हळदीची निर्यात झाली होती. मात्र चालू हंगामात गेल्यावर्षीपेक्षा १० टक्के अधिक निर्यात होण्याची आशा व्यक्त केला जात आहे. त्यामुळे हळदीला चांगला दर मिळू शकतो, असा अंदाज आहे. सध्या हळदीला प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार ते ८ हजार रुपये दर मिळतो. हा दर पुढील काही दिवस टिकून राहतील, असा अंदाज हळद बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम