कापूस चोरून नेणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २० नोव्हेंबर २०२२ |“ पारोळा तालुक्यातील बोळे येथील शेतशिवारातून वेचून ठेवलेल्या कापसाचे गाठोडे चोरून नेण्याचा प्रकारसमोर आला होता. दरम्यान, शेतकऱ्यांनी दुचाकीचा पाठलाग करून दोन संशयित आरोपींना रंगेहात पकडले आहे. दोघांना पारोळा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पारोळा तालुक्यातील बोळे येथील शेतकरी रामसिंग आधार गिरासे (वय-४०) यांच्या शेतात कापूस वेचून मोठ्या पोत्यात भरून शेतात ठेवले होते. ते घरी नेणे करिता छोटा हत्ती टेम्पो आणणे करीता बोळे गावात आले व टेम्पो घेऊन शेतात ठेवलेले कापसाचे गाठोडे पैकी 2 मोठे गाठोडे दिसून आले नाही. परंतु अज्ञात दोन जणांनी शेतात गाठोडे ठेवल्याचे पाहिले होते. असे शेतकरी रामसिंग गिरासे यांच्या लक्षात होते. त्यांनीच कापूसचे गाठोडे चोरून नेल्याचा संशय बळावल्यानंतर त्यांनी दुचाकीने दोघांना पाठलाग सिंधी कोळ गावपर्यंत केला. इतर शेतकऱ्यांच्या मदतीने दुचाकी (एमएच १८ बीव्ही २७६३) वरील संशयित आरोपी विशाल नामदेव पवार (वय-३३) आणि रविंद्र नागराज कोळी (वय-३१) दोन्ही रा. शिरूर ता.जि.धुळे यांना रंगेहात पकडले.

paid add

दोन्ही संशयितांना पारोळा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले असून दुचाकी जप्त करण्यात आली आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि जयवंत पाटील, पोकॉ हेमचंद्र साबे, पोकॉ किशोर भोई, पोकॉ राहुल पाटील, पोकॉ राहुल कोळी, पोकॉ अभिजित पाटील हे करीत आहेत.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम