देशात गव्हाच्या किमती पुन्हा वाढणार

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २८ ऑक्टोबर २०२२ | देशात यंदा गहू उत्पादन घटले. तसेच निर्यातही जास्त झाली. त्यामुळे गव्हाचे दर तेजीत होते. दिवाळीमुळे ऑक्टोबर महिन्यात गव्हाचे दर वाढले होते. अनेक शेतकऱ्यांनी दर वाढेल, या आशेने गव्हाचा साठा मागे ठेवला होता. शेतकऱ्यांनी गहू साठवून ठेवल्याने एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीतील गहू आवक यंदा मागील तीन वर्षांतील उच्चांकी ठरली. आता ऑक्टोबर महिन्यात दिवाळीच्या सणामुळे गव्हाला मागणी वाढली होती.

यंदाची आवक ५९ लाख टनांनी जास्त आहे.यंदा शेवटच्या टप्प्यात गव्हाची आवक वाढली. याचाच अर्थ असा की शेतकऱ्यांनी यंदा गव्हाचा साठा मागे ठेवला होता. त्यामुळे यंदा सरकारला केवळा १८८ लाख टन गहू हमीभावाने खरेदी करता आला. तर मागील हंगामातील खरेदी ४३४ लाख टनांवर झाली होती.

दुसरीकडे यंदा बाजारातील आवक कमी राहिल्याने दरही तेजीत होते. सप्टेंबर महिन्यात गव्हाला सरासरी २ हजार ५५० रुपये दर मिळाला. तर सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील दर सरासरी २ हजार ४०० रुपयांवर पोहचला होता.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम