आदिवासी शेतकऱ्याच्या सोयाबीनच्या गंजीला माथेफिरूने लावली आग

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २८ ऑक्टोबर २०२२ |लक्ष्मीपूजनाच्या रात्री साक्री तालुक्यातील गव्हाणीपाडा येथील आदिवासी शेतकऱ्याच्या सोयाबीनच्या गंजीला अज्ञात इसमाने आग लावल्याची घटना घडली.

गव्हाणीपाडा येथील चिंतामण धोंडू गांगुर्डे या वृद्ध शेतकऱ्याने गव्हाणीपाडा क्षेत्रातील सोनारे शिवारात दोन एकर क्षेत्रात सोयाबीनचे पीक पेरले होते. पाऊस उघडल्यानंतर पाच-सहा दिवसांपूर्वीच दहा हजार रुपये मजुरी देऊन सोयाबीनची कापणी केली होती. कापलेला सर्व सोयाबीन एकत्र आणून शेतातच गंजी घातली होती. लक्ष्मीपूजनाच्या रात्रीच उपद्रवी अज्ञाताने डिझेल, पेट्रोल, अगरबत्ती व आगपेटीच्या सहाय्याने गंजीला आग लावली.

पिंपळनेर पोलीस स्टेशनचे अ.स.ई. बी. आर. पिंपळे व पोलीस नाईक अतुल पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच सुभाष गांगुर्डे यांच्या गंजीला आग लावण्याच्या उद्देशाने ठेवण्यात आलेले पेट्रोल, डिझेल, अगरबत्ती व आगपेटी असे साहित्य ताब्यात घेतले. आकस्मिक घटनेची माहिती तलाठी सूर्यवंशी व कृषी सहाय्यक सीमा सोनवणे यांना देण्यात आली.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम