तुती लागवड कधी आणि कशी करावी

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २१ नोव्हेंबर २०२२ | आपण तुतीपालन विषयी माहिती देणार आहोत आणि आपण खालील दिलेल्या मुद्यावर जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

तुतीच्या पानांचा उपयोग

तुतीच्या पानांचा उपयोग हा रेशीम अळ्यांना खाद्य म्हणून करत असतातत्याच प्रमाणे दुधाळ जनावरांना चारा म्हणून त्याचा वापर करता येतो, तसेस गायींना व म्हशींना तुटीचे पाने खाण्यासाठी दिल्याने त्यांच्या दूध उत्पन्नात वाढ होते. तसेस तुतीच्या पानांचा वापर हा गांडूळ खात तयार होण्यासाठी सुद्धा वापरतात, विदेशा मध्ये तुतीच्या पानांपासून चहा तयार करतात. त्याच प्रमाणे वाईन सुद्धा तयार करतात. तुतीच्या वाळलेल्या फांद्याचा वापर हा गावाकडे चुली साठी इंधन म्हणून वापरतात.

 

रेशीम उत्पादन

रेशीम उत्पादन हा एक शेतीपूरक व्यवसाय आहे. कुकुटपालन ,दुग्धव्यवसाय यासारख्या शेतीला जोडधंदा म्हणून या व्यवसायाला पहिले जाते. अत्यंत कमी खर्चात आणि उपलब्ध साधनामदे या व्यवसायाला सुरुवात करता येते. घरातील लहान थोर माणसांचा या व्यवसायात उपयोग करून घेता येतो त्यामुळे मजुरांवर येणार खर्च देखील कमी होतो.

ऊस ,द्राक्ष यासारखे नगदी पिके घेणारा शेतकरी देखील हा व्यवसाय योग्य प्रकारे करू शकतो. शेतकऱ्यांना कमीत कमी वेळेत महिन्यात उत्पन्न मिळवता येते. महाराष्ट्र राज्याची कृषीविषयक परिस्थिती बघता तुती चे बाराही महिने उत्पन्न घेता येऊ शकते. फक्त शेतीवरच अवलंबून राहणे हे शेतकऱ्यांसाठी दुरापास्त झालेले आहे त्यामुळे शेतीला पूरक व्यवसाय करणे हि आता काळाची गरज बनली आहे. पट्टा पद्धतीने तुतीची लागवड केल्याने इतर आंतरपिके घेऊन शेतीच्या उत्पन्न वाढवता येते. तुती बागेस रोग व कीटक यांचा प्रादुर्भाव होत नसल्याने औषदोपचाराचा खर्च वाचतो. रेशीम अळयांची अंडीपुंज सवलतीच्या दराने ४५० टक्के अनुदान दरात शासना मार्फत पुरवली जातात. रेशीम अळयांचे आयुष्यमान एकूण 28 दिवसांचे असते. त्यातील २४ दिवसच त्यांना तुतीचा पाला खाद्य म्हणून द्यावा लागतो. या २४ दिवसांपैकि सुरवातीचे १० दिवस शासना मार्फत वाजवी दराने रेशीम किटक जोपासून दिले जातात. यामुळे शेतकऱ्यांस अवघ्या १४ दिवसांत कोश उत्पादनाचे पीक घेता येईल. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ, श्रम, व पैसा वाचेल व तसेच एकूण उत्पादनात २५ टक्के पर्यंत वाढ होईल. शेतीमध्ये रेशीम कोशा शिवाय अवघ्या १४ दिवसांत उत्पन्न देणारे आज एकही नगदी पीक नाही. सुशिक्षीत बेरोजगारांना नोकऱ्यां शिवाय यात दरमहा उत्पन्न मिळविता येते. शेतकऱ्यांच्या कोष खरेदीची हमी शासनाने घेतलेली आहे. त्यासाठी कोष खरेदी केंद्रे स्थापन करण्यात आलेली आहे. ६५ रु. ते १३० रु. प्रति किलो याचा दर आहे.
तुती लागवडीसाठी हवामान कसे असावे

तुती लागवडीस थंड तसेच गरम दोन्ही प्रकारचे हवामान मानवते. २५० उ ते ३०० उ हे तापमान तुती झाडांच्या वाढीस योग्य असून अशा हवामानात पाल्याची वाढ जोरदार होते व चांगले पाल्याचे उत्पन्न घेता येते.
तुती लागवडीसाठी जमीन कशी असावी

मध्यम,भारी ,हलकीं प्रकारची जमीन असली तरी तुती लागवडीस योग्य असते. परंतु डोंगर उताराची तसेच ज्या जमिनीत पाणी साचून राहते व पाण्याचा निचरा होत नाही अशी जमीन या साठी चालत नाही कारण अशा जमिनीत तुती लागवड केल्यास त्याची मुळे कुजून खराब होतील. त्यामुळे पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीतच तुतीची लागवड करावी.

तुती झाडाचे आयुष्य किती असते

तुती झाडाचे आयुष्य लागवड केल्यानंतर १० ते १५ वर्षेपर्यंत जिवंत राहत असल्याने, दरवर्षी लागवड करावी लागत नाही त्यामुळे लागवडीचा खर्च इतर पिकां प्रमाणे वारंवार येत नाही. तुतीस एप्रिल, मे, महिन्यात पाणी मिळाले नाही तरी तुती मरत नाही. पाणी मिळाल्यानंतर तुती पुन्हा जोमाने वाढतात. झाडाची मुळे खोलवर जात असल्याने जमिनीचा थर किमान 2 फूट खोल असावा तुती झाडाच्या वाढीसाठी जमीनीतील सामु (पी.एच.) हा 6.5 ते 7 पर्यंत असणे गरजेचा असतो.

 

तुती लागवडीसाठी जमीन कशी तयार करावी

 

एप्रिल ते मे महिन्यात नांगरट करावी. तुती लागवडीसाठी जमीन तयार करताना नांगराने 12″ ते 15″ इंच (30 ते 45 सेंटीमीटर )खोल नांगरट करावी. उभी व आडवी दोन्ही बाजूनी नांगरट करावी जेणेकरून जमिनीचा कठीण पणा कमी होऊन जमीन भुसभुशीत होईल असे केल्याने जमिनीतील कीड मरते व तणाचे प्रमाण देखील कमी होते. पुन्हा 15 ते 20 दिवसांनी लाकडी नांगराने उभी व आडवी नांगरटनि करून घ्यावी. नांगरणी झाल्यावर 9 ते 10 टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पूर्ण जमिनीवर सम प्रमाणात पसरून घ्यावे नंतर वखरणी करून जमीन सारखी करून घावी.

तुतीच्या जाती

तुतीच्या भरपूर जाती आहे आणि त्यांच्या वापरानुसार त्यांच्या जातीची निवड करावी मुख्यतः तुतीच्या जाती मोरस लिव्हिगॅटा, मोरस सेरॅटा, हिमालयन मलबेरी, मोरस नायग्रा, मोरस ऑस्ट्रॅलिस आहे,

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम