डेअरी फार्म व्यवसाय कसा करावा

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २१ नोव्हेंबर २०२२ | डेअरी फार्म व्यवसाय कसा सुरु करावा ? डेअरी फार्म म्हणजे काय तर दुग्धव्यवसाय . दूध हि एक अशी गोष्ट आहे जी रोजच्या जीवनामध्ये निरंतर लागणारी आहे.रोजच्या आहारामध्ये दूध व दुग्धजन्य पदार्थाला मोठी मागणी असते .इतर व्यवसायाच्या तुलनेत या व्यवसायात अर्थार्जनाची शाश्वती निश्चित आहे .

 

दुधाची मागणी हि सातत्याने वाढतच आहे .त्यातच दूध हे जर खात्रीपूर्वक आणि भेसळ नसणारं असेल तर दुधाला दर सुद्धा चांगलाच मिळतो . या व्यवसायासाठी शैक्षणिक आर्थिक उप्लब्धतेपेक्षा चिकाटी , दृढ निश्चय , सातत्य , योग्य माहिती तसेच प्रामाणिकपणा असणे गरजेचं आहे . तुम्ही मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करू इच्छित असाल तर मोठं मोठ्या दूध कंपन्यांशी संपर्क साधून देखील तुम्ही त्यांना दुधाचा पुरवठा करू शकता आणि चांगल्या प्रकारे नफा मिळवू शकता .

डेअरी फार्म व्यवसाय कसा सुरु करावा

एक यशस्वी दुग्धव्यवसायाचे गुपित सांगायचे म्हणजे जनावरांच्या खाद्यात मिळवलेली स्वयंपूर्णता, उत्पादन खर्चात केलेली बचत, चारा, दुधाची दर्जेदार कॉलीटी आणि सातत्य.

दूध व्यवसाय करताना यांच्यातील बारकावे समजून घेणे गरजेचे आहे .

एक चांगले डेअरी फार्म सुरु करण्यासाठी खालील माहिती असणे गरजेचे आहे.

डेअरी फार्म करताना सर्वात आधी महत्वाचे असते कि कोणत्या जातीची गायी व म्हशी निवडाव्यात .पशूंची शारीरिक स्थिती , दिवसाला दूध किती देतात हे गाई खरेदी करण्याआधी तपासून पाहावे . संकरित गाई , देशी गाई ,दुधाळ म्हशी आणि गावठी दुधाळ गाई या प्रामुख्याने दुधासाठी वापरल्या जातात .
मालवी, नागौरी, साहिवाल, थारपार,करडज्ज,लगीर गाई,निमाडी,लाल सिंधी गायी,लाल कंधारी गायी या काही गाईंच्या जाती आहेत .
म्हशींच्या जाती-मेहसाणा पंढरपुरी मुऱ्हा सुरती

यशस्वी दुग्धव्यवसायासाठी गोठा व्यवस्थापन महत्वाचे असते . गाईचा गोठा हा स्वच्छ , मोठा ,हवेशीर तसेच भरपूर सूर्यप्रकाश येणार असावा .वेळच्या वेळी वैद्यकीय तपासणी तसेच योग्य आहार देऊन आपले पशुधन हे निरोगी राहून दूध उत्पादन चांगले देऊ शकते.
आपल्याकडे चाऱ्याची उपलब्धता हि मोठ्या प्रमाणावर असली पाहिजे साधारण ५ ते ७ गाईंसाठी एक एकर जमिनीचा चारा लागू शकतो .

गोठ्यामध्ये हवा खेळती राहावी व योग्य तो सूर्यप्रकाश मिळावा यासाठी योग्य बांधणी करावी . गाईंना चारा खाताना जास्त वाकावे लागू नये यासाठी ३ फूट उंचीवर गव्हाण असावे . गव्हाणीमध्येच पिण्याच्या पाण्याची सोय करावी जेणेकरून पाण्यासाठी बाहेर जावे लागणार नाही . गोमूत्र वाहून नेण्यासाठी स्वतंत्र बांधणी करावी जेणे करून गोठ्यामध्ये स्वछता राहील आणि गाई या आजारी पडणार नाहीत . गाईंना चारा आणि पाणी देण्याच्या वेळा ठरून पाळाव्यात . गाई बसण्याची जागा तसेच गाईची कास हि कोरडी असावी मुक्त संचार गोठा पद्धतीचा देखील वापर करता येऊ शकतो . चारा साठून ठेवण्यासाठी मुरघासाची निवड करता येते.

मुरघास बनवण्यासाठी खालील पिकांचा वापर करू शकता :-

मका
नेपियर घास
बाजरी
ज्वारी

वरील सर्व पिके हे दाण्यामध्ये असताना गुळाचे पाणी आणि मीठ टाकून तो घास एका मोठ्या प्लास्टिक पिशवीमध्ये साठून त्याला हवाबंद करून वर्षभर वापरता येतो परंतु ह्या मुरघासाला हवा आणि पाणी लागणार नाही याची काळजी घ्यावी नाहीतर तो खराब होऊ शकतो .

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम