कृषी सेवक । २३ जानेवारी २०२३ । देशातील शेतकरी विविध प्रकारची शेती उत्तम प्रकारे करीत असतात व त्यातून चांगला नफा हि कमवीत असतात, यामध्ये प्रामुख्याने गहू, ज्वारी, मका, ऊस, सोयाबीन यांची शेतीकरून चांगला नफा कमावतात. परंतु हे करताना सतत आपल्याला कामात व्यस्त राहावं लागते. मात्र यातुलनेत फळबागा कमी वेळ देऊन अधिक नफा देतात. फळबागांकडे शेतकऱ्यांनी लक्ष दिले तर पहिले तीन चार वर्ष चांगली मेहनत घेऊन व्यवस्थित नियोजन लावले तर झाडे मोठी झाल्यानंतर फक्त उत्पादन घेता येते. आज आपण लाल पेरू बागेतून कसे उत्पन्न काढता येते याबाबत माहिती घेणार आहोत.
लाल पेरूच्या लागवडीतून भरपूर पैसे कमावण्याची संधी आहे. तसेच एकदा का झाडे लावली कि पैसाच पैसा मिळतो असं म्हटलं जाते. परंतु यासाठी कष्ट, योग्य नियोजन, तज्ञांचा सल्ला अतिशय महत्वाचा ठरतो. आज आपण याबाबींबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.
पेरूच्या विविध जाती बाजारात उपलब्ध आहेत. यामध्ये देशी पेरूसोबत आता अनेक विकसित जातीही तयार करण्यात आल्या आहेत. सध्या तैवान अन लाल पेरूची लागवड करण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. खाली आम्ही पेरूच्या विविध जातींची नवे दिली आहेत.
१. पिंक तैवाण पेरू , २. लखनवी पेरू, ३. बनारसी, ४. हरिझा , ५. लाल पेरू
जपानी रेड डायमंड पेरूची लागवड देशात वाढली आहे. लाल डायमंड पेरूची शेती करून नफा कमवायचा असेल तर त्यासाठी योग्य तज्ज्ञांचे म्हणणे जाणून घेणे गरजेचे आहे. पेरू बगातूवून वर्षाला एकरी लाखो रुपयांची कमाई होऊ शकते. लाल पेरू लागवडीसाठी कशी जमीन असावी? लाल पेरूची रोपे कुठे मिळतात? बागेचे व्यवस्थापन कसे करावे याबाबत आपण खाली सविस्तर जाणून घेऊ शकता.
जपानी रेड डायमंड पेरूची लागवड करण्यास सध्या शेतकरी प्राधान्य देत आहेत. 10°C ते 42°C तापमानात लाल पेरूचे चांगले उत्पादन मिळू शकते. मात्र, तापमान थोडे कमी राहिले तरी शेतकऱ्यांनी काळजी करण्याची गरज नाही. तसेच लाल पेरूची झाडे काळ्या, वालुकामय चिकणमाती असलेल्या जमिनीत चांगली वाढते. यासाठी जमिनीचा पीएच 7 ते 8 असावा असं तज्ञ सांगतात.
जपानी डायमंडची लागवड करताना दोन ओळीत 8 फूट अंतर ठेऊन रोपे लावावीत. तसेच एका ओळीतील दोन रोपांच्यामध्ये 6 फूट अंतर असावे. रोपाच्या योग्य वाढीसाठी वर्षातून दोनदा छाटणी करावी. जर फळ चिकूच्या आकाराचे झाले तर ते फोम पिशवी किंवा वर्तमानपत्राने झाकून ठेवा. त्यामुळे पेरू चांगला शिजतो. तसेच फळे बांधून ठेवली तर त्याला डाग पडत नाहीत. पेरूच्या झाडांची वाढ चांगली होण्यासाठी शेणखत वापरणे फायद्याचे ठरते. शेणखत, गांडूळ खात यांच्या वापराने जमिनीची सुपीकता वाढते. याशिवाय एनपीके सल्फर, कॅल्शियम नायट्रेट, मॅग्नेशियम सल्फेट, बोरॉन यांचा वापर रासायनिक खतांमध्ये करता येतो. झाडाला पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन वापरणे गरजेचे आहे. यामुळे पाण्याची बचत होतेच परंतु यासोबतच झाडाला पुरेसे पाणी नियमित देणे शक्य होते. जपानी लाल डायमंड पेरू दिसायला टरबूजासारखा लाल आणि नाशपातीसारखा गोड असतो. आपल्याकडे देशी पेरू 50 ते 60 रुपये किलोने बाजारात विकला जातो. दुसरीकडे, जपानी रेड डायमंड पेरू 100 ते 150 रुपये किलो दराने विकला जातो. सामान्य पेरूच्या तुलनेत 3 पटीने कमाई होते.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम