राज्यात तापमान वाढले मात्र खान्देशात थंडी कायम !

बातमी शेअर करा

कृषी सेवक । २३ जानेवारी २०२३ ।  राज्यातील तापमान वाढत असतांना शेतकऱ्यासह नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे. तर दुसरीकडे दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रात अजूनही थंडीचा कडाका कायम आहे.

धुळे जिल्ह्यातील तापमान 10 अंश सेल्सिअसच्या आत असल्याने वातावरणातील गारठा कमी झालेला नाही. यातच जिल्ह्यात धुक्याची चादर अजूनही कायम असल्याने याचा परिणाम रब्बी हंगामाच्या पिकांवर होत आहे.

paid add

जिल्ह्यातील बहुतांश भागात कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तसेच गहू, हरभरा, मका या पिकांना देखील या वातावरणाचा फटका बसणार असून उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ढगाळ वातावरण आणि पहाटे पडणारे धुके यामुळे कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. तरी शेतकऱ्यांनी बुरशीनाशक आणि कीटकनाशकाची नियमितपणे फवारणी करणे आवश्यक आहे, असं आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात आलं आहे.

वातावरणातील गारठा आणि धुके यामुळे हवेची गुणवत्ता देखील खराब झाली आहे. धुळ्यात हवेचा गुणवत्ता निर्देशांक 174 इतका नोंदवला गेला आहे. पुढील काही दिवस तापमान 10 अंश सेल्सिअस आत राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम