मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे १२ लाख ४९ हजार हेक्टरचे नुकसान

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ३० ऑक्टोबर २०२२ | मराठवाड्यात यावर्षी अतिवृष्टीमुळे १२ लाख ४९ हजार ७३१ हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले आहे.

दरम्यान, सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये वारंवार झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या उरलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सप्टेंबर-ऑक्टोबर या दोन महिन्यांत मराठवाड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे १७ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.

एकूण २८ लाख ७६ हजार ८१६ शेतकरी बाधित झाल्याचे सांगण्यात आले. नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांना 2500 कोटी रुपयांची मदत लागणार आहे. असा अंदाज वर्तवला जात आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम