५० हजार प्रोत्साहन अनुदानाचा दुसरा टप्पा सुरु

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २१ नोव्हेंबर २०२२ | नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना प्रोत्साहन दिले जावे या अनुषंगाने गेल्या ठाकरे सरकारने अनुदान देण्याची घोषणा केली होती. याची प्रत्यक्षात अंमलबजावणी मात्र वर्तमान शिंदे सरकार करत आहे. शिंदे सरकारने 2017 18, 2018 19, 2019 20 या तीन वर्षांपैकी किमान दोन वर्षाची नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.

या अनुदानाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्यासाठी शेतकरी बांधव गेल्या दीड महिन्यांपासून वाट पाहत आहेत. दरम्यान आता दुसऱ्या टप्प्यासाठी बँकांकडून पोर्टलवर नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड केल्या जात आहेत. याबाबत बँकांना शासनकडून निर्देश जारी झाले आहेत. निश्चितच, अडीच वर्षानंतर प्रोत्साहन पर अनुदानाला मुहूर्त लाभले आहे. विशेष म्हणजे अनुदानाचा पहिला टप्पा पार झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यासाठी अजून दीड महिन्याचा खंड पडला आहे. त्यामुळे प्रोत्साहन पर अनुदानासाठी शेतकरी बांधवांना चांगलीच वाट पहावी लागत आहे.

आता दुसऱ्या टप्प्यासाठीची प्रोसेस सुरू झाली आहे. शासनाकडून बँकांना नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना 23 नोव्हेंबर पर्यंत पोर्टलवर शेतकऱ्यांची नावे अपलोड करण्यास सांगितले गेले आहे. म्हणजे आवश्यक ती सर्व प्रोसेस करून या महिन्याअखेर या टप्प्यातील शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर सार्वजनिक होणार आहे. पोर्टलवर यादी प्रकाशित झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात ज्या पद्धतीने विशिष्ट क्रमांक देऊन शेतकऱ्यांना आधार प्रामाणिकरण करण्यास सांगितले आणि नंतर अनुदान वर्ग करण्यात आले, अगदी त्याच पद्धतीने दुसऱ्या टप्प्यात शेतकऱ्यांची नावे प्रकाशित होणार आहेत त्यांना विशिष्ट क्रमांक मिळणार आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम