जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या विध्यार्थ्यानी इंधनबचतीसाठी बनवली पर्यावरणपूरक “पॅराबोलिक सौर चूल”

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ३० ऑक्टोबर २०२२ | दिवसेंदिवस वाढणाऱ्या एलपीजीच्या किमतींमुळे अनेक घराचं बजेट बिघडत चाललं आहे. एलपीजी सिलिंडरची किंमत आता एक हजार रुपयांच्या पुढे गेली आहे. या वेगाने वाढणाऱ्या गॅसच्या किमतीमुळे सर्वसामान्य हैराण झाले आहेत. यातून सुटका करण्यासाठी जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या इनोव्हेशन व इनक्युबेशन सेंटरच्या विध्यार्थ्यानी नवा पर्याय समोर आणला असून या सेंटरचे विध्यार्थी नवीन सौर चूलीवर काम करत आहे. या सौर चूलीला “पॅराबोलिक सौर चूल” असं नाव देण्यात आले आहे.

ग्राहक ज्यावेळी ही सौर चूल खरेदी करायला जाईल, फक्त त्याच वेळी त्याला मोजके पैसे मोजावे लागतील, परंतु त्यानंतर मात्र कोणताही खर्च ग्राहकाला करावा लागणार नाही. देखभाल आणि महिन्याचा कोणताही अतिरिक्त खर्च करावा त्याला लागणार नाही. ज्या पदार्थांना शिजवण्यासाठी जास्त तापमानाची आवश्‍यकता असते, त्याकरिता पॅराबोलिक सौर चुलीचा वापर होतो. सौर पॅराबोलिक कुकरचा उपयोग ५ ते ७ माणसांच्या कुटुंबासाठी कमीत कमी वेळेमध्ये कोणतीही अतिरिक्त ऊर्जा न वापरता स्वयंपाक करण्यासाठी होतो. हा सौर कुकर, पॅराबोला आकाराच्या तबकडीपासून बनविण्यात येतो. या सौर कुकरची निर्मिती करताना मुख्यतः एम. एस. रॉड, चकाकी दिलेला अॅल्युमिनियम पत्रा, लोखंडी पट्टी, स्क्रू इत्यादींचा वापर करण्यात येतो. पॅराबोलिक सोलर कुकर हा सुट्या भागाच्या रूपात उपलब्ध असून, त्याची जोडणी अत्यंत सोपी असते. हा सोलर कुकर घरगुती तसेच होस्टेल्स, धाबे इत्यादी ठिकाणी स्वयंपाक करण्यास उपयुक्त आहे.

यामध्ये एकाच वेळेला ५ ते ७ माणसांचे अन्न ४० ते ४५ मिनिटांत शिजविले जाते. त्यामुळे या कुकरच्या वापराने विविध प्रकारचे शाकाहारी व मांसाहारी पदार्थ कमी वेळेत बनविणे शक्य आहे. वापरण्यास अत्यंत सोपा व कोठेही वाहून नेता येणारा असा हा बहुपयोगी कुकर असून, यामध्ये सर्व प्रकारचे भाजण्याचे पदार्थसुद्धा करता येतात. यामध्ये आपला नेहमी वापरातला प्रेशर कुकर ठेवून त्यामध्ये सर्व प्रकारचे अन्न शिजवता येते. इंधनाची बचत करून पर्यावरणाचा समतोल राखण्यास हा कुकर मदत करतो. या कुकरद्वारे ५०० अंश सेल्सिअस इतके उच्च तापमान मिळू शकते. चांगल्या सूर्यप्रकाशात एक तासामध्ये अन्न शिजवू शकतो. हाताळण्यास आणि स्वच्छ करण्यास अगदी सोपा आहे. टिकाऊ, सुरक्षित व अधिक कार्यक्षम असून ऊन असेपर्यंत दिवसातून या कुकरला कितीही वेळा वापरता येते.

या प्रकल्पाचे संपूर्णतः समन्वय इनोव्हेशन व इनक्युबेशन सेंटरचे डीन प्रा. डॉ. सौरभ गुप्ता, प्रा. मुकुंद पाटील व विध्यार्थ्यानी साधले तर भविष्यात सामान्य जनतेसाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरत महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे संस्थेचे कार्यकारी संचालक श्री. प्रितमजी रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व अॅकडमीक डीन प्रा. डॉ प्रणव चरखा यांनी विध्यार्थी व प्राध्यापकांचे अभिनंदन करतांना नमूद केले.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम