मक्याचे दर आटोक्यात

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ६ नोव्हेंबर २०२२ | देशातील बाजारात सध्या मक्याचे दर काहीसेआटोक्यात आले आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात मका दरात सुधारणा पाहायला मिळाली. युक्रेनमधून होणारी धान्य निर्यात पुन्हा बंद झाल्याने मका दराला आधार मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याचे व्यवहार ६८० डाॅलर प्रतिटनांवर पोचले. तर देशात सध्या नवा मका बाजारात येतोय. त्यामुळं दर दबावात आहेत. सध्या मक्याला देशात प्रतिक्विंटल १ हजार ८०० ते २ हजार १०० रुपये दर मिळतोय. ऐन आवकेच्या हंगामातही मका २ हजार ते २ हजार २०० रुपयांच्या दरम्यान राहू शकतो, त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्याने विक्री करण्याचे आवाहन तज्ञानी व्यक्त केले आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम