कृषी सेवक | ६ नोव्हेंबर २०२२ | देशातील बाजारात सोयाबीन दरातील सुधारणा कायम आहे. चीनची वाढलेली मागणी, पामतेलातील तेजी आणि सुर्यफुल तेल उपलब्धतेतील अडचणी यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर सुधारले आहेत. त्यामुळे देशातही सोयाबीनच्या दरात वाढ झाली. आज देशातील अनेक बाजारांमध्ये सोयाबीनचा सरासरी कमाल दर ५ हजार ३०० रुपयांपर्यंत पोचला होता. तर काही बाजारांमध्ये दराने ५ हजार ४०० रुपयांचा टप्पा गाठला होता. सोयाबीनचे दर वाढत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्याने विक्री करावी, असं आवाहन जाणकारांनी केलं आहे.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम