गोकुळच्या म्हैस दूध उत्पादन वाढीसाठी अमेरिकेतून १.४६ कोटींचा निधी

बातमी शेअर करा

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) आणि भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन (बायफ), उरळी कांचन यांच्या वतीने म्हैस दूध उत्पादन वाढीसाठी दोन महत्वाचे प्रकल्प राबवले जाणार आहेत. इन्व्हारमेंटल डिफेन्स फंड अमेरिका यांचेकडून १.४६ कोटींचा निधी मिळणार असल्याची माहिती गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी दिली.

या प्रकल्पांचा मुख्य उद्देश म्हशींच्या प्रजनन व आरोग्य सुधारण्यासाठी संतुलित आहाराची उपलब्धता सुनिश्चित करणे आणि वैरण बँकेचे बळकटीकरण करणे आहे. या प्रकल्पांतर्गत किमान २०० गावांतील १५०० म्हशींचा समावेश होणार आहे.

प्रकल्पाच्या यशस्वितेसाठी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड, आनंद आणि नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट कर्नाल (हरियाणा) यांचे तांत्रिक सहाय व मार्गदर्शन मिळणार आहे.

प्रकल्पांची वैशिष्ट्ये

1. पशुखाद्य तपासणी आणि सुधारणा:
– पोषण तत्त्वांचे प्रयोगशाळेत तपासणी.
– सुधारित चारा उत्पादन आणि संतुलित आहार.
– पशुधन व्यवस्थापनातील सुधारणा.
– कार्यशाळा, प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष सादरीकरणाद्वारे माहितीचे प्रसारण.

2. उत्पादकता व प्रजनन सुधारणा:
– विशेष विकसित केलेल्या म्हशींची माहिती संकलन.
– दूध उत्पादकता व प्रजनन क्षमतेच्या समस्यांचे निदान.
– रक्त तपासणी आणि संतुलित आहाराच्या सूचना.
– पारंपरिक दूध उत्पादनाचा अभ्यास.

या प्रकल्पांमुळे गोकुळच्या दूध संकलनात गुणवत्तापूर्ण वाढ होण्यास मदत होणार असल्याने दूध उत्पादकांनी या प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन अरुण डोंगळे यांनी केले आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम