कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) या संस्थेच्या सत्तांतरानंतरचे तिसरे वर्ष हीरकमहोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. या वर्षात गोकुळने दूध उत्पादकांच्या स्वावलंबनाचा संकल्प पूर्ण केला आहे.
गेल्या वर्षभरात अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी दूध उत्पादकांसाठी नवनवीन प्रोत्साहन योजना राबवून दूध संकलनाचा १८ लाख लिटरचा टप्पा पार केला. दूध उत्पादक, ग्राहक, वितरक, आणि कर्मचारी यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
म्हैस दुधाच्या वाढत्या मागणीला प्रतिसाद देण्यासाठी गोकुळ विविध योजना आणत आहे. अध्यक्ष डोंगळे यांनी सांगितले की, गोकुळने २० लाख लिटर संकलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे आणि म्हैस दूधवाढीसाठी विशेष योजना राबवणार आहे. याशिवाय, दुधाचे अन्य पदार्थ विक्रीत वाढ करण्यासाठी मार्केटिंग यंत्रणा सक्षम करण्यात येणार आहे.
२०२३-२४ मधील ठळक बाबी:
– दैनंदिन सरासरी अडीच लाख लिटर दूध संकलनात वाढ.
– १८ लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पार.
– ‘चेअरमन आपल्या गोठ्यावर या’ अभियानांतर्गत १२५ गोठ्यांना भेट.
– मुंबई आणि पुणे मार्केटमध्ये ‘गोकुळ शक्ती टोन्ड दूध’ आणि ‘गोकुळ पेढा फ्लेव्हर मिल्क’ ची निर्मिती.
– मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिराला २५० टन तुपाचा पुरवठा.
– नवी मुंबई वाशी येथे नवीन दुग्धशाळेची उभारणी.
– करमाळा येथे नवीन सौर ऊर्जा प्रकल्प उभारणी.
भविष्यातील योजना:
– भोकरपाडा-खोपोली येथे १५ एकर जागा खरेदी.
– गडमुडशिंगी येथे आयुर्वेदिक औषध कारखाना निर्मिती.
– नवी मुंबई वाशी येथे १५ टन क्षमतेचा दही प्रकल्प.
– गोकुळ केसरी स्पर्धेचे आयोजन.
धोरणात्मक निर्णय:
– गोकुळ श्री पुरस्कार १ लाख रुपये.
– म्हैस दूधवाढीसाठी जातिवंत म्हैस खरेदी अनुदान ४० हजार.
– वैरण कुट्टीसाठी प्रतिटन १ हजार रुपये अनुदान.
– कर्मचाऱ्यांसाठी सरासरी ५ हजार रुपये वेतनवाढीचा त्रैवार्षिक करार.
– दूध संस्थांच्या व्यवस्थापन खर्चामध्ये प्रतिलिटर १० पैसे वाढ आणि संस्था कर्मचारी यांना प्रोत्साहनपर प्रतिलिटर ५ पैसे वाढ.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम