अधिकारी असल्याची थाप मारून शेतकऱ्याचे १ लाख लुटले

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १६ नोव्हेंबर २०२२ | गांजा अफू चेक करणारे अधिकारी असल्याची बतावणी करत दोन जणांनी शेतकऱ्याच्या कापडी पिशवीतील १ लाख रुपयांची रोकड घेऊन पसार झाल्याची घटना पारोळा तालुक्यातील रामनगर तांडा गावाजवळ घडली आहे.

याबाबत पारोळा पोलीस स्टेशनला अज्ञात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश पंडित पाटील (वय-५२) रा. कन्हेरे ता. पारोळा हे शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. मंगळवार १४ नोव्हेंबर रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास सुरेश पाटील हे पारोळा तालुक्यातील तांडा फाट्याजवळ गावाकडे पायी जात असताना त्यांच्या मागून अज्ञात दोन जण दुचाकीने आले. आम्ही गांजा अफू चेक करणारे अधिकारी आहोत असे सांगून सुरेश पाटील यांची हातात असलेल्या कापडी पिशवी चेक केली. त्यात एक लाख रुपये ठेवलेले होते. हे पैसे कशाचे आहेत असे विचारल्यावर मी बँकेतून काढले असल्याचे शेतकरी सुरेश पाटील यांनी सांगितले. त्यावर ‘आम्ही चेक करू’ असे बोलून त्यांनी १ लाख रुपये घेऊन दुचाकीवरून पसार झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सुरेश पाटील यांनी पारोळा पोलीस स्टेशनला तक्रार दिली त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढचा तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव करीत आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम