कृषी सेवक | १६ नोव्हेंबर २०२२ | देशात सोयाबीनला सध्या सरासरी ५ हजार ३०० ते ५ हजार ७०० रुपये दर मिळतोय. तर कमाल दर ६ हजार ते ६ हजार १०० रुपयांच्या दरम्यान आहेत. सोयाबीन दरवाढीच्या अपेक्षेने शेतकरी विक्रीसाठी थांबले आहेत. मात्र जागतिक सोयाबीन बाजारातील स्थिती पाहता सोयाबीनला ५ ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळू शकतो. त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्यानं विक्री केल्यास फायदेशीर ठरेल, असं आवाहन जाणकारांनी केले आहे.दरम्यान देशात यंदा १२० लाख टन सोयाबीन उत्पादन (Soybean Production) होईल. तर शेतकऱ्यांनी ऑक्टोबर महिन्यात १७ लाख टनांची विक्री केल्याचा अंदाज सोपानं व्यक्त केला.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम