110 कारखान्यांनी एकरकमी एफआरपी नाही दिली

बातमी शेअर करा

कृषी सेवक I १२ डिसेंबर २०२२ I सध्या उसाचा गळीत हंगाम सुरू आहे. यामुळे कारखाने किती दर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यंदा ऊस दरावरून अनेकदा आंदोलन केले गेले. तसेच सरकारने देखील एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय घेतला.

असे असताना यंदाच्या हंगामात नोव्हेंबरअखेरही राज्यातील कारखान्यांनी  एकरकमी ‘एफआरपी’ देण्याकडे काणाडोळाच केल्याचे चित्र आहे. यामुळे याकडे सरकारचे लक्ष आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

यामध्ये १६४ पैकी केवळ ५४ साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी शेतकऱ्यांना अदा केली आहे. तब्बल ११० कारखान्यांनी अजूनही शेतकऱ्यांना एकरकमी ‘एफआरपी’ दिलेली नाही. यामुळे पैसे कधी मिळणार असा प्रश्न शेतकरी उपस्थित केले जात आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम