सरकारकडून निकटवर्तीयांच्या साखर कारखान्यांना मदत

बातमी शेअर करा

कृषी सेवक I १२ डिसेंबर २०२२ I सध्या उसाचा हंगाम सुरू आहे. अनेक कारखाने हे आर्थिक परिस्थितीत अडकले असताना सरकारकडून जवळच्या लोकांच्या कारखान्यांना मदत केली जात आहे. आता सहकारी साखर कारखान्यांसाठी तयार करण्यात आलेल्या विस्तार योजनेंर्तगत मदत केली जात आहे.

यामध्ये बशासकीय भागभांडवल प्राप्त करून घेणारा राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांचा कारखाना पहिला लाभार्थी ठरला आहे. यामुळे इतर कारखान्यांचा यामध्ये नंबर लागला नाही.

तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या कारखान्यांना ३४ कोटी रुपयांचे भागभांडवल राज्य शासनाने मंजूर केले आहे. यामुळे इतर कारखान्यांचे काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

राज्यात सध्या २०० साखर कारखाने असून, त्यात १०१ सहकारी साखर कारख्यान्यांचा व ९९ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. यापैकी १५ सहकारी साखर कारखान्यांची प्रतिदिन १२५० मे. टन गाळप क्षमता आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम