कापूस निर्यातीमध्ये १३७ टक्क्यांनी वाढ; हंगामातील दर घसरणीचा परिणाम!

बातमी शेअर करा

कृषी सेवक । २७ एप्रिल २०२४ ।महाराष्ट्र सोबतच देशात कापूस लागवडीखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. महाराष्ट्र हे राज्य कापूस लागवडीसह उत्पादनाच्या बाबतीत देशात पहिल्या क्रमांकावर आहे. सध्या देशातील अनेक भागांमध्ये पावसाचे प्रमाण अल्प राहिले असून भारताची कापूस निर्यात १३७ टक्क्यांनी वाढून १८ लाख गाठींवर पोहचली आहे. प्रामुख्याने ऑक्टोबर-मार्च या कालावधीत भारतीय किमती कमी राहिल्याने कापूस निर्यात वाढली आहे. असे भारतीय कापूस महामंडळाने आपल्या आकडेवारीत म्हटलेले आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे नुकसान, गुजरातच्या कांद्याला परवानगी; केंद्र सरकारचा निर्णय!

कापूस महामंडळाच्या आकडेवारीप्रमाने, ऑक्टोबर २०२३ ते मार्च २०२४ या सहा महिन्यांदरम्यान भारताची कापूस निर्यात १३७ टक्क्यांनी वाढून १८ लाख गाठींवर गेली आहे. भारताने २०२२-२३ हंगामात १५.५९ लाख गाठींची निर्यात केली होती.

paid add

सव्वा लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर २० हजार रुपये जमा!

दरम्यान सीएआयने हंगामाच्या सुरुवातीला आपल्या अंदाजात म्हटले की, “देशभरात यावर्षी ३११ लाख गाठी कापसाची मागणी कायम राहणार आहे. तर यावर्षी १४ लाख गाठी कापूस निर्यात केला जाऊ शकतो. जो मागील हंगामात १५.५९ लाख गाठी इतका करण्यात आला होता. परंतु, यंदा सीएआयच्या अंदाजापेक्षा अधिक कापूस निर्यात झाली आहे. तर यावर्षी २२ लाख गाठी कापसाची आयात केली जाऊ शकते. जी मागील हंगामात १२.५ लाख गाठी नोंदवली गेली होती.”

 

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम